अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर यांनी भूमिका साकारलेला ‘बापमाणूस’ हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आई गमावलेल्या लहान मुलीचा सांभाळ एक बाप कसा करतो यावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट खरंतर ‘फादर्स डे’ दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु, चित्रपटगृहांमध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने आम्हाला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली अशी खंत अभिनेता पुष्कर जोगने व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “विश्वास बसत नाहीये”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर क्रिती सेनॉनची प्रतिक्रिया; तर आलिया म्हणाली, “मला जमेल तोपर्यंत…”

‘बापमाणूस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुष्कर जोगने अलीकडेच महाएमटीबीशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “बापलेकीचं कथानक असल्याने आमचा चित्रपट ‘फादर्स डे’ला रिलीज करायचं आम्ही ठरवलं होतं. पण, महाराष्ट्रात राहून मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळत नाही हे आपलं दुर्दैव आहे. मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळत नसल्याने आम्हाला चित्रपटगृहांकडे शो लावण्यासाठी भीक मागावी लागते. मुंबईत बॉलीवूडशी स्पर्धा होत असल्याने याचा फटका कायम मराठी चित्रपटांना बसतो.”

हेही वाचा : प्रसिद्ध मालिकेतील कलाकारांनी खाल्ली सुप्रिया पाठारेंच्या लेकानं बनवलेली पावभाजी, चवीबद्दल म्हणाले…

पुष्कर जोग पुढे म्हणाला, “आम्हाला शो मिळत नाहीत आणि चित्रपटगृहांकडे भीक मागावी लागते ही वस्तूस्थिती आहे. जूनच्या महिन्यात ‘बापमाणूस’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, त्यावेळी दोन हिंदी चित्रपट आणि एक इंग्रजी चित्रपट सिनेमागृहांमध्ये सुरु असल्याने आम्हाला शो मिळाले नव्हते. मुंबईत मार्व्हल, सुपरहिरोंचे इंग्रजी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जातात पण, मराठी चित्रपट पाहायला जात नाहीत…हे दुर्दैव आहे. त्यामुळेच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.”

हेही वाचा : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

“२५ ऑगस्टच्या दरम्यान दोन मराठी चित्रपट रिलीज होणार होते आणि मला मराठी निर्मात्यांबरोबर ‘बापमाणूस’ क्लॅश करायचा नव्हता. कारण, मराठी चित्रपटांना आधीच फार कमी शो मिळतात. त्यानंतर ७ सप्टेंबरला ‘जवान’ रिलीज होतोय असा सगळा विचार करुन मी चित्रपटासाठी १ सप्टेंबर तारीख निश्चित केली.” असं पुष्करने जोगने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor pushkar jog reacts on not getting enough screens in theatre for marathi movies sva 00
Show comments