बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. नुकतंच रितेश देशमुखने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने स्त्रियांबद्दल वक्तव्य करताना दिसत आहे.
रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच रितेशने एक रिल शेअर केला आहे. यात त्याने लग्नानंतर बायकोच्या आवाजात होणाऱ्या बदलाबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित
“मित्रांनो, जेव्हा आपण लग्नासाठी मुलगी पाहायला जातो, तेव्हा तिचा आवाज हा रेडिओपेक्षाही कमी असतो. पण मला कळत नाही लग्न झाल्यावर त्यात बुफर कसे लागतात”, असे रितेश यावेळी बोलताना दिसत आहे. हे सर्व ऐकून जिनिलियाने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “तू माझा…” वरुण धवनच्या ‘त्या’ पोस्टनंतर आलिया भट्ट संतापली, कारण…
रितेशचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला समदु:खी असल्याचे सांगितले आहे. अनेकांनी कमेंट करत त्याला तो योग्य बोलतोय, असे सांगितले आहे. रितेश भावा, मी तुझ्याबरोबर आहे. मला देखील हा त्रास आहे, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. तर एकाने एकदम बरोबर म्हटलं, अशी कमेंट केली आहे.