महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती. विलासराव देशमुख आणि त्यांच्या मुलांचं खूप छान नातं होतं. वडिलांच्या आठवणीत त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.
रितेश देशमुख हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याच्या दोन मुलांचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत त्याची दोन्हीही मुलं विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर उभी असल्याचे दिसत आहे. याबरोबर त्याने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आणखी वाचा : “काही व्यक्ती …”, विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया भावुक, शेअर केली खास पोस्ट
“माझ्या खडतर काळात जेव्हा मला हताश वाटतं, काहीच करता येणार नाही असं वाटतं, पराभूत झाल्यासारखं वाटतं…त्यावेळी मी विचार करतो की मी कुणाचा मुलगा आहे… या एकाच विचारानं मी पुन्हा एकदा जग जिंकण्यासाठी सज्ज होतो… वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबा… तुमची दररोज आठवण येते”, असे रितेशने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश व जिनिलीयाची दोन मुलं त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत.
“काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा… प्रत्येक दिवशी तुम्हाला साजरं करतो…,” असं जिनिलीयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.