अभिनेता रितेश देशमुख हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी रितेश देशमुख-जिनिलीया देशमुखचा वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. नुकतंच रितेशने त्याच्या कुटुंबाबद्दल भाष्य केले.
रितेश देशमुखने नुकंतच ‘मुंबई तक’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वेड चित्रपट, जिनिलिया, विलासराव देशमुख यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी रितेश देशमुखला घरात तुझे टीकाकार कोण? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने “माझ्या घरात माझे सर्वात मोठे टीकाकार हे माझे दोन्हीही भाऊ आहेत.”
आणखी वाचा : “आम्हा दोघांना…” अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर सुयश टिळकची पहिली प्रतिक्रिया
“धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोघेही माझ्यासाठी मोठे क्रिटीक्स आहेत. आतापर्यंत त्यांना माझं कोणतंही काम आवडलेलं नाही. वेड हा पहिला चित्रपट आहे जो अमित भैय्यांना आवडला. त्यानंतर मी थेट सिद्धिविनायक दर्शनाला गेलो होतो.” असे रितेशने सांगितले.
“धीरजचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तो कायम मला पाठिंबा देत असतो. पण अमित भैय्या हे कायमच मला मार्गदर्शन करत असतात. हे काय जमलं नाही, हे काय आवडलं नाही, हा काय चित्रपट आहे का, असे ते मला सतत सांगत असतात”, असे रितेश देशमुखने म्हटले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
दरम्यान, रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला ‘वेड’ चित्रपट प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशी तगडी स्टार कास्ट होती.