मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. त्याने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. संतोष सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो कायमच विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच संतोषने एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर बाबा मला म्हणाले, “पुरुषही…”

संतोष म्हणाला, “मी तेव्हा लंडनला गेलो होतो. माझ्या गर्लफ्रेंडला वाटलं की मी तिथं दुसऱ्या मुलीला भेटायला चाललो आहे. मी तिला व्हिडीओ फोन करुन दाखवलं की मी मित्राकडे आलो आहे. पण तिच्या मनातला तो संशयाचा किडा काही जाईना. मग दोन दिवसांनी माझा नंबर ब्लॉक झाला. एक दिवस ती मला गोरेगावला भेटायला आली. ती मला म्हणाली मला हे नातं ठेवायचं नाहीये. मी म्हणालो ओके.”

संतोष पुढे म्हणाला “मी कॉफी प्यायलो आणि वेटरला माझ्या कॉफीचे पैसे दिले. तिला म्हणालो तुझे तू भर. त्यानंतर ती रागाला आली आणि मला म्हणाली, तू किती नीच आहेस. तिने ५०० रुपये काढले आणि माझ्या अंगावर फेकून ती रागाने निघून गेली. मी तेच ५०० रुपये वेटरला दिले कॉफी प्यायलो आणि निघालो.”

हेही वाचा- सिद्धार्थ जाधवच्या आयुष्यात ‘ही’ माणसं आहेत महत्त्वाची, प्रार्थना बेहेरे म्हणाली…

नुकताच संतोष जुवेकर ‘डेट भेट’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याबरोबर सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे. तसेच २१ जुलैला प्रदर्शित झालेला ‘MINUS 31’ या हिंदी चित्रपटातही तो झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor santosh juvekar talk about his breakup story dpj