अभिनेता संतोष जुवेकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याचा डेट भेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संतोष सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो कायमच विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता एका मुलाखतीत संतोषने त्याला कोणत्या प्रकारची भूमिका साकारयची आहे याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- “…तुम्ही जाणून घ्यायची गरज नाही,” वडिलांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी
संतोष म्हणाला “आत्तापर्यंत मी साकारलेल्या भूमिका राकट स्वरुपाच्या होत्या. अनेक चित्रपटामध्ये मी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्या बघून मला तशाच प्रकारच्या भूमिकांची ऑफर येत आहे. पण मी वाट बघत होतो मला रोमॅंटिग भूमिका साकारायची आहे. मला ती इमेज माझ्या करिअरमध्ये आणायची आहे.”
संतोष जुवेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ‘मोरया’ चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. नुकताच त्याचा डेट भेट हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका होती. या व्यतरिक्त संतोष २१ जुलैला प्रदर्शित झालेला ‘MINUS 31’ या हिंदी चित्रपटातही झळकला आहे.