केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने फक्त आत्तापर्यंत या चित्रपटाने ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांनी जया काकडे ही भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या नवऱ्याचे म्हणजे अरुण देसाई या पात्राची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- अभिनय नाही तर रोहिणी हट्टंगडी यांना करायचं होतं ‘या’ क्षेत्रात करिअर; पण…
‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकार उपस्थित होते. यादरम्यान अरुण देसाई म्हणजे सतीश जोशी यांनी ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे.
सतीश जोशी म्हणाले, “बाईपण भारी देवा’चा यशानंतर जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा सगळ्या बायकांना माझ्याबरोबर सेल्फी काढायची असते. चित्रपटातील माझं पात्र बघून बायका माझ्या खऱ्या आयुष्यातील बायकोला विचारतात की मी खराखूरा असाच आहे का? त्यामुळे माझी बायको संभ्रमात पडते की खरं उत्तर देऊ की खोट उत्तर देऊ. मग मी त्यांना सांगतो की घरो घरी मातीच्या चुली.”
हेही वाचा- “इन्स्टाग्रामवर बायका मला…” ‘बाईपण भारी देवा’नंतर आलेल्या अनुभवाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटासाठी सतीश जोशी यांची निवड कशी केली याबाबतचा खुलासा केला होता. केदार शिंदे म्हणालेले. “आम्ही जेव्हा हा चित्रपट करण्याचे ठरवले, तेव्हा मी आणि अजित भुरे वेगवेगळी ठिकाणं पाहत होतो. या चित्रपटात अरुण देसाई आणि जया देसाई यांचे जे घरं दिसतंय, त्याठिकाणी आम्ही पोहोचलो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सतीश जोशी यांनी दार उघडलं. त्यांचा हसरा चेहरा केदार यांच्या मनात भरला.
हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’च्या टीमसह केदार शिंदेंची लेक सनाने काढला ‘भारी’ सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाली…
त्यानंतर केदार यांनी सतीश यांच्यापुढे या चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी लगेचच आपला होकार कळवला. विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांच्या नवऱ्याचे अरुण देसाई हे पात्र अजित भुरे यांना साकारायचे होते. पण केदार शिंदेंनी सतीश यांची निवड केली. परंतु चित्रपटात सतीश यांच्या पात्राला व्हॉईस ओव्हर देण्याचे काम हे अजित भुरे यांनी केले आहे.