काही महिन्यांपूर्वी ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ हा वाद पाहायला मिळाला. माऊली प्रॉडक्शन्सचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे मूळ नाटक पुन्हा रंगभूमीवर सुरू होत असतानाच माऊली भगवती प्रॉडक्शन्स व अभिनेता शरद पोंक्षे यांच्या ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे ५० प्रयोग सुरू करण्यात आले. पण यामुळे नाटकाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला. मूळ नाटकाचे निर्मिते उदय धुरत यांनी नाटकाचं शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. याच वादावर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ गोखले स्पष्टच बोलला.

‘रंगभूमी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना सौरभ गोखले म्हणाला, “एकतर मला हा वाद चालू झालेलाच माहित नव्हतं. कारण माझ्याकडे जेव्हा नाटक आलं. तेव्हा या सगळ्या गोष्टी घडायच्या होत्या किंवा त्या प्रोसेसमध्ये होत्या. त्यामुळे मला हे माहित होतं की, शरद दादांनी एका पॉइंटला हे नाटक करण बंद केलं होतं. भूमिकेसाठी सूट होत नसल्यामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी नाटक बंद केलं.”

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
lakhat ek aamcha dada
शत्रूचा प्लॅन फसणार, तुळजाला ‘त्या’ युक्तीसाठी डॅडींकडून शाबासकीची थाप मिळणार; पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो
Netizens Trolled Marathi actress Prajakta Mali, know
“फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता ‘सूर नवा ध्यास नवा’मधून बाहेर, भावुक पोस्ट करत म्हणाला, “आयुष्यात…”

पुढे सौरभ म्हणाला, “माझ्याकडे जेव्हा नाटक आलं तेव्हा मला वाटलं, आता त्या निर्मात्यांना पुन्हा सुरू करायचं आहे. त्यामुळे त्यांना नव्या कलाकारांची गरज आहे. त्यावेळी शरद दादांनी नाही सांगितलं होतं. पण त्यानंतरही तेही नाटक आलं जे ५० प्रयोगासाठी सुरू केलं. मग मला वाटलं की, त्यात काहीतरी एक वेगळा अँगल आहे. पण मी तो विचार करत नाही. कारण मी त्या ऑरिजनल कलाकारांच्या संचामध्ये काम केलं नव्हत किंवा त्या नाटकाचा भाग नव्हतो. त्यामुळे या नाटकाकडे एक फ्रेश नाटक आणि फ्रेश भूमिका, एक नवीन दिग्दर्शक, नवीन प्रोडक्शन हाऊस, या दृष्टीकोनातून मी या नाटकाकडे बघितलं. त्यामुळे मी कधीही त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झालो नाही. त्या चर्चेमध्ये मी सहभागी झालो नाही आणि मला वाटतं, त्या लोकांमध्ये जे वाद झाले तो त्यांच्या वैयक्तिक वाद होता.”

यानंतर सौरभला विचारलं की, पण या वादावर तुझी प्रतिक्रिया काय? यावर अभिनेता म्हणाला, “हे दुर्दैवी आहे. ज्या नाटकाने इतिहास रचला. कारण अतिशय कमी व्यावसायिक नाटकं आहेत की, ज्यांनी आठशे, सव्वा आठशेचा टप्पा पार केलाय. ती काय सोपी गोष्ट नाही. ते सुद्धा अशा पॉइंटनंतर पहिले काही वर्ष या नाटकावर बंदी असून मग न्यायालयाने ती बंदी उठवून त्यानंतर नाटक सुरू झालं. मग पुन्हा त्यानंतर भांडणं, मारामारी, राडे, जाळपोळ हे सगळं होऊन आठशे प्रयोग होणं. हे नाटकं इतकं अजरामर नाटकं, त्या ऑरिजनल संचाला करायला मिळालं होतं. शरद दादांसारख्या एका तुफान अभिनेत्याने एका पातळीवर नेऊन ठेवलं. प्रेक्षकांनी उचलून धरलं. पुढे जाऊन त्या नाटकाबद्दल, त्या कलाकृतीबद्दल अशा पद्धतीचे वाद होणं, हे मला वाटतं दुर्दैवी आहे. सगळ्यांच्या दृष्टीनेच दुर्दैवी आहे. त्यातलं कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हरले. मी म्हणणे की, त्याचा धड कोणाला फायदा होणार आहे, धड ना तोटा होणार आहे.”

“पण नशीबाने त्या कॉन्टेंटला कधी धक्का लागणार नाही. जे प्रदीप दळवींना लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, त्याला कधी धक्का लागणार नाही. पण यातला एक पॉइंट असा असू शकतो. याच्यातला धोका कधी, कधी हा असतो, जर हा वाद कुठल्या वेगळ्या अँगलने गेला आणि न्यायालयाने असं ठरवलं की, हा वाद सुटण्यासारखा नाहीये. मग आता ही कलाकृती कोणीच करायची नाही. म्हणजे जसं बरेच वेळेला टायटलच्या बाबतीत होतं. हे टायटल कोणी वापरायचं नाही किंवा हे चिन्ह कोणीच वापरायचं नाही. मग त्यावेळेला नुकसान होणार आहे. ते प्रेक्षकांचं होणार आहे. त्यामुळे हे दुर्दैवी आहे. पण त्याला काही करू शकत नाही,” असं स्पष्ट मत सौरभने ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ या वादावर व्यक्त केलं.