मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे सामाजिक विषयांवर नेहमीच त्यांची मतं अगदी परखडपणे मांडताना दिसतात. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरल होत असतात.
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवरुन जुन्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ३ डिसेंबर हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवद्गीतेबाबत भाष्य करणारा हा व्हिडीओ सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. “श्रीकृष्ण आम्ही शिकतच नाही. आम्ही दहीहंडीच्या पुढे त्याला मोठाच होऊ देत नाही. श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता हा ८० टक्के हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. त्या कृष्णाच्या आयुष्यातील एकच दिवस आम्ही साजरा करतो…दहीहंडी” असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा>> Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय
पुढे भगवद्गीतेचं महत्त्व पटवून देत ते म्हणतात, “श्रीकृष्ण मोठा झाल्यानंतर त्याने जगाला ज्ञान देणारी भगवद्गीता ज्यादिवशी सांगायला सुरुवात केली. तो भगवद्गीतेचा जन्मदिवस गीता जयंती कोणालाही साजरी करावीशी वाटत नाही. ज्यादिवशी या हिंदुस्थानात गीता जयंती साजरी केली जाईल, त्यादिवशी करामत होईल”.
हेही वाचा>> “मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट
हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला मिळाली नवी मालिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…
शरद पोंक्षे सध्या ‘दार उघड बये’ या झी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत ते खलनायकाच्या भूमिकेत असून त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.