प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच देशाचा इतिहास, राजकीय परिस्थिती, सामाजिक घडामोडी याविषयी आपली परखड मतं मांडत असतात. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये दमदार अभिनय करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शरद पोंक्षे व्याख्यानासाठी अनेक ठिकाणी जात असतात. चित्रीकरणामधून वेळ काढत ते व्याख्यान करतात. यादरम्यानचे काही व्हिडीओ शरद पोंक्षे सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटासाठी अजय पुरकर यांनी घटवलं तब्बल ‘एवढं’ किलो वजन, म्हणाले…

कोणतंही राज्य बलवान बनवायचं असेल तर दोन ‘श्री’ शिकवावे लागतात याविषयी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षेनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, “जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोघांबद्दल शिकवण दिली. कोणतंही राज्य बलवान, बलाढ्य बनवायचं असेल, जगात सर्वोत्तम राष्ट्र बनवायचं असेल तर हे दोन ‘श्री’ शिकवावे लागतात. या दोघांच्या नावातचं ‘श्री’ आहे.”

हेही वाचा : “तुझे केस इतके लांब सडक कसे?” प्राजक्ता गायकवाडने सांगितलं रहस्य, म्हणाली…

“पृथ्वीतलावर कुठल्याही धर्मातील, कुठल्याही देवाच्या नावात ‘श्री’ नाही. हिंदुंच्याही नाही… श्रीदत्त, श्रीगणपती असं आपण नाही म्हणत…श्रीराम या नावतंच श्री आहे. पत्रावर आपण जे श्री. शरद पोंक्षे असं लिहितो त्याचा अर्थ श्रीयुत असा होतो आणि हा ‘श्री’ वेगळा आहे. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे पुरुषार्थ, श्री म्हणजे आदर्श, श्री म्हणजे मर्यादा, श्री म्हणजे बलाढ्य, श्री म्हणजे विद्वत्ता असे अनेक त्या ‘श्री’चे अर्थ आहेत.” असं शरद पोंक्षेंनी सांगितलं. हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली पंजाबच्या मंत्र्याची भेट, म्हणाली “त्यांनी शुभेच्छा…”

दरम्यान, सध्या शरद पोंक्षे ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी ‘बाईपण भारी देवा’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. लवकरच त्यांचे बहुचर्चित नाटक ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे पुन्हा एकदा रंगमंचावर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad ponkshe shared his opinion about religious matters video goes viral on social media sva 00
Show comments