मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. गेली अनेक वर्षं तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकत आला आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सिद्धार्थदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत त्याने मराठी असण्याचा अभिमान व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ नेहमीच त्याच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या घडामोडी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतो. आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी गायक होऊ शकलो नाही,” व्हिडीओ पोस्ट करत सिद्धार्थ चांदेकरने दिलं स्पष्टीकरण

सिद्धार्थने आज त्याचा पारंपरिक वेशभूषेतील एक फोटो पोस्ट केला. यात त्याने झब्बा-सलवार घातलेला दिसत असून डोक्यावर फेटा बांधला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “जगातले सगळे पेहराव एका बाजूला आणि झब्बा-सलवार, डोक्यावर फेटा आणि कपाळावर टिळा एका बाजूला. मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि मराठी जगणं याहून दुसरं सुख नाही, दुसरा अभिमान नाही. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”

हेही वाचा : Video: ‘झिम्मा’च्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

आता त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. त्याने हा फोटो पोस्ट करताच त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याच्या या लूकचं आणि त्याने लिहिलेल्या कॅप्शनचं कौतुक करत त्याला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor siddharth chandekar shared a special post on the occasion of maharashtra din rnv