मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचे आई-वडील परदेशात फिरायला गेले आहेत. सिद्धार्थने फेसबुकवर फोटो आणि पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. माझी काळजी करून नका आणि तुम्ही खूप मजा करा, असं म्हणत सिद्धार्थने पालकांच्या परदेशवारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

“…मग ती विचारधारा गेली कुठे?” वैभव मांगलेंचा राजकीय पक्षांना सवाल; म्हणाले, “दुसऱ्या पक्षाचे लोक…”

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

सिद्धार्थ जाधवने लिहिलं, “This is the “moment ” …
आई बाबांचा पहिला परदेश दौरा…
माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे ,
हे मी शब्दात नाही सांगू शकत…
त्यांच्या आशीर्वादाने “मी जग बघायला फिरलो “
आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने
“मी त्यांना जग बघायला पाठवतोय…”
त्यातला आज त्यांचा हा “पहिला प्रवास…”
माझ्या शाळेतल्या पहिल्या सहली पासून ते आतापर्यंत लंडन ला शूटला जाईपर्यंत जी excitment ,आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त excitment,आनंद आज मला वाटतोय….
ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय..
तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको..
मी आहे तुमच्यासोबत…..
कायम….”

दरम्यान, सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आहेत. ‘तू खूप नशीबवान आहेस’, ‘सिद्धू तुझा अभिमान वाटतो’, ‘खूप छान अशीच प्रगती करत राहा’, ‘गर्व आहे तुमच्यावर, तुम्ही खरे युथ आयकॉन’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader