सिद्धार्थ जाधव हा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतदेखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज एका चित्रपटासाठी लाखो रुपये आकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवची सिनेसृष्टीतील पहिली कमाई किती होती हे त्याने सांगितलं आहे.

सिद्धार्थ आतापर्यंत अनेक नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनोरंजन सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करत असताना त्याला बराच संघर्ष करावा लागला. तर आज तो बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिनेसृष्टीत काम करताना त्याला पहिलं मानधन किती मिळालं होतं आणि त्या पैशांचं त्याने काय केलं याचा खुलासा आता त्याने केला आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

आणखी वाचा : “माकड दिसतोय…,” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला सिद्धार्थ जाधवचं चोख उत्तर; म्हणाला…

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी शाळेत होतो तेव्हा माझ्या अंधमित्र-मैत्रिणीसाठी पेपर लिहायला जायचो. त्यावेळी मला ५०० किंवा १ हजार रुपयांचा एक चेक मिळाला होता तो मी घरी दिला होता. त्याला मी कमाई असे म्हणणार नाही. पण मनोरंजन सृष्टीत काम करायला लागल्यावर ‘तुमचा मुलगा करतो काय’साठी मला नाईटसाठी दोनशे रुपये नाईट मिळाले होते. तीच माझी पहिली कमाई असेल कारण मला नक्की आठवत नाही की या क्षेत्रातील माझी पहिली कमाई किती. ते पैसे मी आईला दिले होते.”

हेही वाचा : Video: “महेश मांजरेकर सर जेव्हा…” ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील कलाकारांचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्ष शिंदे म्हणाला…

तर सिद्धार्थ लवकरच ‘अफलातून’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Story img Loader