मराठीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. आपल्या बिंदास्त स्वभावामुळे सिद्धार्थ नेहमीच चर्चेत असतो. मालिका, चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून सिद्धार्थ आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चांगले मित्र-मैत्रीणी आहेत. पण एका कारणामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थने सोनलीबरोबर झालेल्या भांडणाचा किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा- “तुम्हाला इथे येऊन आगाऊपणा…”, नेटकऱ्याच्या ‘त्या’ टोमण्याला अभिनय बेर्डेचे सडेतोड उत्तर, म्हणाला…
सिद्धार्थ म्हणाला, “क्षणभर विश्रांती चित्रपटाच्या सेटवर माझं आणि सोनालीचं जोरदार भांडण झालं होतं. तुम्ही जर चांगले मित्र असता आणि तुमचे वाद झाले तर ते विकोप्याला जातात. माझं सगळचं जास्त आहे. प्रेम, मैत्री आणि द्वेष तिन्ही जास्त असतात. त्या वादानंतर आम्ही १० वर्ष एकमेकांशी बोललो नाही. सोनालीने माझ्याशी बोलण्याचे खूप प्रयत्न केले होते पण माझं ठरलं होतं . नाही बोलत तर जाऊदे. भांडणानंतरही आम्ही ‘इरादा पक्का’ चित्रपटात काम केलं. कामाच्या बाबतीत ती खूप प्रोफेशनल आहे.”
सिद्धार्थ पुढे म्हणाला, “पण जेव्हा श्रीदेवी गेल्या तेव्हा जाणवलं की माणसाचा काही भरवसा नाही. मी तिला फोन केला आणि दुरावा दूर करत म्हणालो आपण बोलत जाऊ. आमच्यात अजूनही छोटी-मोठी भांडण सुरुच आहेत. पण सोनालीबद्दल मला वेगळी आत्ममियता वाटते. आज ती ज्या पद्धतीने काम करते मला अभिमान वाटतो.”
सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सिद्धार्थने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्गंबाई अरेच्चा’मधून त्याने चित्रपटामध्ये पदापर्ण केलं. त्यानंतर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘टाइम प्लीज’, ‘दे धक्का’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जत्रा’, हुप्पा हुय्या’, ‘साडे माडे तीन’, चित्रपटातील भूमिका चांगल्याच गाजल्या. मराठीबरोबर सिद्धार्थने हिंदी चित्रपटांमध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘गोलमान फन अनलिमिटेड’ ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिम्बा’, ‘राधे’, ‘सुर्यवंशी’, ‘सर्कस’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये सिद्धार्थने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.