Sachin Pilgaonkar: काही दिवसांपूर्वी राज्यसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना उपसभापती हरिवंश यांनी जया अमिताभ बच्चन असं पूर्ण नाव घेतलं होतं. पण यामुळे समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या संतापल्या होत्या. फक्त जया बच्चन असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. पूर्ण नाव घेण्याची गरज नव्हती, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथे रेकॉर्डमध्ये तुमचं पूर्ण नाव जया अमिताभ बच्चन असं आहे, त्यामुळे तसा उल्लेख केला असं उपसभापती संसदेत म्हणाले होते. त्यावर “महिला या आपल्या नवऱ्याच्या नावाने ओळखल्या जातात. पण त्यांचं काहीच अस्तित्व नाही का? त्यांना स्वतःचं कोणतंही कर्तृत्व नाही का? की महिलांना फक्त त्यांच्या पतीच्या नावानेच ओळखलं जाईल”, असा सवाल जया बच्चन यांनी केला होता. या प्रकरणावर सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांना विचारण्यात आलं. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम

सचिन पिळगांवकर म्हणाले, “आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जसं नाव घेतलं जातं जे कुठल्याही दुसऱ्या संस्कृतीमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांना कोणाला आवडणं, न आवडण्यापेक्षा त्यांच्या संस्कारांमध्ये ती गोष्ट आहे का? हेही आपण पाहणं खूप गरजेचं आहे.”

अवघ्या २३ व्या वर्षी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह केली पूजा; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक

मला नेहमी सचिनची बायको म्हटलं जातं – सुप्रिया पिळगांवकर

सुप्रिया म्हणाल्या, “तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आज सांगते. मला आजपर्यंत असं कधीच ऐकू आलं नाही की ही सुप्रिया आहे. हे बघ सुप्रिया चाललीये, कधीच नाही. ‘ती बघ सचिनची बायको’, ‘अरे वो सचिन उसकी बीवी है’ असं म्हणतात. म्हणजे मी इथे काम करतेय, मराठी इंडस्ट्रीतसुद्धा मी नेहमी सचिनची बायकोच असते. या गोष्टीचा मला अभिमानच आहे. मला या गोष्टीचं खूप कौतुक आहे की मला सचिनची बायको म्हणून ते ओळखतात. इथे मी म्हणायला पाहिजे की मला काय माझी वेगळी ओळख नाही का? पण असं काही नाही. आजही मला सचिनची बायको म्हटलं जातं.”

सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर (फोटो – इन्स्टाग्राम)

औरंगाबादमध्ये जन्म, दमदार पदार्पण अन् सुपरहिट सिनेमे करून बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय अभिनेत्री

यावर सचिन ‘लोकमत फिल्मी’शी बोलताना पिळगांवकर म्हणाले, “मला पण सुप्रियाचा नवरा म्हणूनच ओळखतात.” यावर सुप्रिया म्हणाल्या “हे जोक मारतायत. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगत आहे.” दुसरीकडे सचिन म्हणाले, “मी गंमत करत नाहीये, मला सुप्रियाचा नवरा म्हणतात. अरे तुम्ही एकटे आलात सुप्रिया वहिनी कुठे आहेत, ती स्वतंत्र आहे तिला वेगळं बोलवायला पाहिजे ना, एकावर एक फ्री थोडीच आहे, मी आलो म्हणून ती माझ्याबरोबर येईलच असं काही आहे का?”

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

सचिन पिळगांवकर पुढे एक उदाहरण देत म्हणाले, “आम्हा दोघांवर लोकांचं इतकं प्रेम आहे, इतका भरभरून आशीर्वाद देतात की काही फिल्म्समध्ये आमचा थोडासा दुरावा दाखवण्यात आला, एक-दोन चित्रपटांमध्ये, तो स्क्रीनप्लेचा भाग असतो पण लोकांना ते नाही आवडलं. लोकांनी ते स्वीकारलं नाही. लोक म्हणाले आम्ही पाहूच शकत नाही, हीच ताकद आहे. मी म्हणतो की हा चित्रपट आहे, असं खरंच थोडी होणार आहे. तरीही लोक म्हणतात की आम्ही हे बघू शकत नाही.”

यानंतरही सुप्रिया यांनी पुढे म्हटलं की तरीही लोक मला सचिनची बायको असंच संबोधतात आणि मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor supriya sachin pilgaonkar on jaya bachchan reaction after calling her by husband name hrc