मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडतांपैकी एक म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. त्यांच्याकडे त्यांचे चाहते आयडियल कपल म्हणून बघतात. अनेकदा ते एकमेकांबद्दल भरभरून व्यक्त होत असतात. तर आता त्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये एकमेकांची नाव काय नावाने सेव्ह केली आहेत याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उमेश आणि प्रियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्या नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो किंवा रील शेअर करून त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी घडत आहेत ते चाहत्यांशी शेअर करत असतात. आता त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल एक गुपित शेअर केलं आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकमेकांच्या मोबाईलमध्ये त्यांची नावं काय सेव्ह केली आहेत हे सांगत त्यामागचं कारणही सांगितलं आहे.

आणखी वाचा : “मी मालिकांपासून लांब राहिले कारण…”, प्रिया बापटचा खुलासा, म्हणाली, “या माध्यमात…”

प्रियाने उमेशचं नाव कुकू असं सेव्ह केलं आहे. याचा अर्थ म्हणजे, कामतमधला के आणि उमेशमधला यू. तर उमेशने त्याच्या मोबाईलमध्ये प्रियाचं नाव बंड्या म्हणून सेव्ह केलं आहे. उमेशने त्यांच्या लग्नाच्या आधीच प्रियाचं नाव बंड्या म्हणून सेव्ह केलं होतं आणि ते अजूनही त्याने बदललेलं नाही. त्याला मुलीचा फोन आला आहे हे बाकीच्यांना कळू नये म्हणून त्याने प्रियाचं नाव बंड्या म्हणून सेव्ह केलं होतं. तर एकदा प्रियाचा फोन उमेशच्या वडिलांनी उचलला होता आणि वडिलांचा आवाज ऐकून प्रियाने लगेचच तो फोन कट केला.

हेही वाचा : तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…

प्रिया आणि उमेशचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांच्यामधील या भन्नाट केमिस्ट्रीचं आता नेटकरी कौतुक करत आहेत.