मराठीमधील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत सध्या बराच चर्चेत आहे. उमेशने आजवर बऱ्याच चित्रपटात काम केल आहे. नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून उमेशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बऱ्याच वर्षांनंतर उमेश नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर परतला आहे. दरम्यान एका मुलाखतीत उमेशने राजकारणात येण्याबाबतच वक्तव्य केलं आहे.
उमेश म्हणाला, “मला मुख्यमंत्री किंवा कोणतंही मोठं पद मिळालं तर सगळ्यात आधी लोकांचा विश्वास मिळवेन. त्यांच आयुष्य सुखकर करण्यासाठी जे करता येईल ते नक्कीच करायला आवडेल. वाहतुकीच्या दृष्टीने काही नियम बनवणे गरजेचं आहे. मला एवढीच खंत आहे की आजही आपण इतकी वर्ष झाल्यानंतर मूळ प्रश्नावरच लढतो आहोत. ते प्रामाणिकपणे जितक्या लवकरात लवकर सुटतील यासाठी प्रयत्न नक्कीच करेन.”
उमेशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नुकतचं त्याच ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकात उमेशबरोबर त्याची पत्नी प्रिया बापट मुख्य भुमिकेत आहे. या नाटकाच्या निमित्ताने उमेश-प्रिया यांची जोडी जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.