महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार दिसणार आहेत. तर त्यांच्याबरोबरच काही जण अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. सध्या या चित्रपटाची टीम या चित्रपटासाठी खूप घाम गाळत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका लोकप्रिय कलाकाराला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

या चित्रपटात प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम असे मातब्बर कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. गेले अनेक दिवस ही संपूर्ण टीम या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटासाठी सर्वजण खूप मेहनत घेत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उत्कर्ष शिंदेला दुखापत झाली असल्याचं त्याने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं.

आणखी वाचा : Video: ज्योतिबाचं दर्शन, पंगतीत जमिनीवर बसून जेवण…; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या टीमचा व्हिडीओ चर्चेत

उत्कर्ष नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. या चित्रपटात उत्कर्ष सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या हाताचं एक बोट फ्रॅक्चर झालं आहे. याचबरोबर तळहातालाही दुखापत झाली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील पोस्ट करत त्याच्या दुखापतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली. या रीलमध्ये त्याचं फ्रॅक्चर झालेलं बोट आणि तळहाताला झालेली जखम दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच सोडत नाहीत.”

हेही वाचा : “रस्त्यात गाडीचा प्रॉब्लेम झाला अन्…” उत्कर्ष शिंदेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटिंगदरम्यान आला विलक्षण अनुभव

आता त्याचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून त्याचे चाहते त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. याचबरोबर अनेकांनी त्याची प्रेमाने विचारपूस करत त्याला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.

Story img Loader