‘अलबत्या गलबत्या’ या लोकप्रिय नाटकाचा उल्लेख केल्यावर डोळ्यासमोर पहिलं नाव अभिनेते वैभव मांगले यांचं येते. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘टाईमपास’ चित्रपटाचे दोन्ही भाग, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमांमुळे वैभव मांगले प्रसिद्धीझोतात आले. अभिनेते कोकणातील असल्याने मालवणी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम आणि प्रभुत्व आहे. अभिनयाबरोबरच ते सामाजिक विषयांवर उघडपणे आपलं मत मांडताना दिसतात.

हेही वाचा : “प्रवेश कधी करतेस?” नागपुरातील राजकीय भेटीगाठींमुळे प्राजक्ता माळी चर्चेत, नेटकरी म्हणाले…

वैभव मांगले यांनी नाट्यगृहांची दुरावस्था, मराठी कलाकारांची सद्यस्थिती अशा अनेक विषयांवर आपली मतं मांडली आहेत. सध्या त्यांनी केलेली अशीच एक फेसबुक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. देशभरात गेल्या आठवड्यात मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यासंदर्भात मांगले यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : गोष्ट पडद्यामागची: सॅम माणेकशा यांचं बांग्लादेशच्या निर्मितीतील योगदान अन् पाकिस्तानवर भारी पडलेल्या मोटरसायकलची गोष्ट!

विजयादशमीच्या दिवशी अलीकडे रात्री उशिराने देवीचं विसर्जन केलं जातं यासंदर्भात वैभव मांगले पोस्ट शेअर केली आहे. “आता दुर्गेच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री ११ पर्यंत गरबा खेळून नंतर वाजत गाजत विसर्जनाची प्रथा कुठून सुरू झाली?” असा संतप्त सवाल वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

हेही वाचा : Video: मलायका अरोराच्या मांडीवर झाली मोठी जखम, डाग लपवताना दिसली अभिनेत्री; व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

vaibhav mangle
वैभव मांगले पोस्ट

वैभव मांगले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करून आपली मतं व्यक्त केली आहेत. एक युजर लिहितो, “आता अगोदर सारखे सण, उत्सव हे भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरे होत नाहीत.” तर दुसरा एक युजर म्हणतो, “यांना देवाच्या नावाने इव्हेंट साजरे करायचे असतात बाकी मुहूर्त, देव भक्ती सब झूट” आणखी काही युजर्सनी, “सध्या मिरवणूक नसून धिंड आहे असं वाटतं”, “आवाजाची मर्यादा नाहीच”, “नवीन प्रथांपैकी एक” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी मांगले यांच्या पोस्टवर केल्या आहेत.

Story img Loader