अभिनेता वैभव तत्त्ववादी हा मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. मराठी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते उत्सुक असतात. नुकताच वैभव तत्तवादीने आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा- Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
वैभवचे जवळचे मित्र भूषण प्रधान आणि पूजा सावंत यांनी वैभवचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त दोघांनी वैभवला औक्षणही केलं. या सेलिब्रेशनमध्ये वैभवचे आणखी काही मित्र सहभागी झाले होते. वैभवने आपल्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत वैभवने त्याच्या मित्रांचे आभार मानले आहेत.
वैभवच्या या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेकांनी त्याला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अभिजित खांडकेकरनेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे.
हेही वाचा- ‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली आहे मोठी! तेजश्री वालावलकरची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
वैभवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर टेलिव्हिजनमधून वैभवने त्याच्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या ”फक्त लढ म्हणा” आणि ”सुराज्य”, ”कॉफी आणि बरंच काही” “मि. अॅण्ड मिसेस सदाचारी” या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडली. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या हंटर या चित्रपटातून वैभवने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात त्याने चिमाजी अप्पाची भूमिका साकारली होती. आता वैभव लवकरच गुलाबजाम २ चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. गुलाबजाम चित्रपटाच्या पहिल्या भागात सोनाली कुलकर्णीबरोबर सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्य़ा भागात सिद्धार्थच्या ऐवजी वैभवची वर्णी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.