मराठी कलाविश्वात सध्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. २५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाचं कथानक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित होतं. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर या दिग्गज कलाकारांसह चित्रपटात अभिनेता विराजस कुलकर्णीने ‘जीवा’ या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत विराजसने भाष्य केलं आहे.

हेही वाचा : पंजाबी विकी कौशलची लाडक्या आईसाठी मराठीतून पोस्ट, नेटकरी म्हणाले, “मन जिंकलस आमचं…”

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

विराजस कुलकर्णी म्हणाला, “चित्रपटगृहांमध्ये मोठा हिंदी चित्रपट सुरु असताना एका मराठी चित्रपटाला एवढं प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज यशस्वी चौथा आठवडा सुरु असताना प्रेक्षक त्याच जल्लोषाने चित्रपटगृहामध्ये जाऊन ‘सुभेदार’ पाहत आहेत. आपण या चित्रपटाचा छोटासा का होईना एक भाग होतो याचा मला खरंच आनंद आहे.”

हेही वाचा : “…वाईट मनस्थिती झाली होती”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “फक्त दोन सीन…”

विराजस पुढे म्हणाला, “‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनेक दिग्गजांना भेटता आलं ही वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कोविडनंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात येतील की नाही? याबद्दल मनात एक भिती होती. ती भिती या ‘सुभेदार’ने खोडून काढली असं मला वाटतं.”

हेही वाचा : पृथ्वीवरून कोणती गोष्ट डिलीट करायला आवडेल? गश्मीर महाजनीने घेतलं प्रसिद्ध अभिनेत्याच्या ‘या’ सिनेमाचं नाव

“मालिका झाली, आता चित्रपट झाला भविष्यात एखाद्या नाटकात काम करण्याची खरंच खूप इच्छा आहे. कारण, माझ्या करिअरची सुरुवात ही रंगभूमीवरून झालेली आहे. प्रेक्षकांसमोर लाइव्ह सादरीकरण करण्याची मजा ही खरंच खूप वेगळी असते. आजवर मी प्रायोगिक रंगभूमीवर काम केलंय पण, आता व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची मनापासून इच्छा आहे. माझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल लवकरच तुम्हाला कळेल” असं विराजसने सांगितलं.