अभिनेत्री आरती सोलंकी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वजनावरुन आरतीला अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. आरतीने ५० किलो वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच आरतीने वजन कमी करतानाचा प्रवास सांगितला. आता नुकतचं दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने वजन कमी करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
आरती म्हणाली, ” डिसेंबर २०२२ मध्ये मी एका रियालिटी शोच्या शूटला गेले होते. तिथे एका महिला सहकलाकाराने मला छक्का म्हणतं हिणवलं होतं. एक स्लोगन होतं. मी एका बाजूला उभी होते आणि बाकिच्या सगळ्या एका बाजूला आणि छक्का म्हणलं की त्या सगळ्या माझ्याकडे हात करायच्या. मी पण त्या फ्लोमध्ये होते. पण त्यानंतर दिवसभर त्यांनी मला कळावं यासाठी ज्यापद्धतीने छक्का म्हणतं मला हिणवलं होतं त्याचा मला खूप त्रास झाला.
आरती पुढे म्हणाली, त्यानंतर कसतरी दिवसभर मी ते शूट केलं. मला ते छक्का म्हणाले याचा राग नाही आला. मला त्यांची वृत्ती खटकली. पण मी काहीच करु शकत नव्हते याच मला प्रचंड वाईट वाटतं होतं. त्यानंतर मी ठरवलं की त्यांच्यासाठी नाही तर स्वत:साठी वजन कमी करायचं”
हेही वाचा- Video : “देशसेवेसाठी तुम्ही अनेक दिवस…”, क्रांती रेडकरची पती समीर वानखेडेंसाठी खास पोस्ट, म्हणाली…
२०२१ पासून आरतीने वजन कमी करायला सुरुवात केली. त्यावेळी तिचं वजन १३२ किलो होतं. डायेटेशिअन आणि व्यायामाच्या मदतीने मी माझं वजन ११९ किलोंवर आणलं. पण काही कारणामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये खंड पडला. आता पुन्हा एप्रिलपासून मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली आहे. आता तिच वजन ८४ किलो आहे. आरतीला तिचं वजन ७० किलोपर्यंत न्यायचं आहे.