मनोरंजन सृष्टीत अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारत लोकप्रिय झालेल्या अनेक अभिनेत्री आज अभिनेत्री आणि बिझनेस वुमन अशा दुहेरी भूमिका सांभाळत आहेत. अभिनय क्षेत्रात काम करतानाच मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे.

विविध मालिका, चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवलेली अभिनेत्री अदिती द्रविडने आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने तिचा स्वतःचा कपड्याचा ब्रँड सुरू केला असल्याचं तिने एक खास पोस्ट करत सांगितलं. ‘द ड्रेसवाली.को’ असं तिच्या कपड्यांच्या या नव्या ब्रँडचं नाव आहे.

ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी

आणखी वाचा : “मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत

आज इंस्टाग्रामवर तिच्या या ब्रँडच्या नावाचं पोस्टर शेअर करत तिने लिहिलं, “‘द ड्रेसवाली. को!’ तुमच्यापैकी अनेकांनी बरोबर ओळखलं. आमची ड्रेसवाली म्हणजे अदिती द्रविड. तीन वर्षे यावर काम केल्यानंतर आज अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही आमचा हा नवीन ब्रँड सुरू करत आहोत. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.”

हेही वाचा : ‘राहुल द्रविड आणि तुझ्यात खरंच कोणतं नातं आहे का?’ चाहत्याच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं उत्तर

आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. तर याचबरोबर तिच्या कपड्यांच्या या नवीन ब्रँडच्या नावाकडेही सर्वांचे लक्ष वेधलं गेलं आहे. आता या तिच्या पोस्टवर तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी कमेंट करत तिचं अभिनंदन करत आहेत. याचबरोबर या नवीन प्रवासासाठी तिला शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader