अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या ‘गणराज गजनान’ या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय अमृताने तिच्या युट्यूब चॅनेलवर ‘तिकीट टू महाराष्ट्र विथ अमृता खानविलकर’ या नव्या ट्रॅव्हल सीरिजची सुरुवात केली आहे. या सीरिजद्वारे अभिनेत्री महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती, परंपरा आणि आपल्याकडील वेगवेगळ्या निसर्गरम्य जागांचं महत्त्व पर्यटकांना सांगणार आहे. नुकताच या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “लालबागचा राजा, मुंबईचा राजा किंवा दुसरा बाप्पा हा एकच…” नम्रता संभेरावचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाली “आतासारखे सेलिब्रिटी स्टेट्स…”

अमृता खानविलकरच्या ट्रॅव्हल सीरिजच्या पहिल्या भागात नाशिक शहराची झलक पाहायला मिळत आहे. नाशिकमधील मंदिरं, संस्कृती आणि येथील पैठणी साड्यांचं महत्त्व याची माहिती या सीरिजमध्ये देण्यात आली आहे. अमृताने ‘तिकीट टू महाराष्ट्र’ या सीरिजची निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग हिंदी आणि इंग्रजी भाषेत चित्रित करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये फक्त काही ठिकाणी अभिनेत्रीने मराठी भाषेचा वापर केला आहे. यावरून एका नेटकऱ्याने कमेंट सेक्शनमध्ये तिला मराठी भाषेच्या कमी वापरासंदर्भात प्रश्न विचारला आहे. या युजरला अभिनेत्रीने कमेंटमध्ये स्पष्ट उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : ‘फुकरे ३’ प्रदर्शनाच्या अगोदरच झाला लीक?; चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता

एका नेटकऱ्याने अमृताच्या व्हिडीओवर “संपूर्ण व्हिडीओमध्ये तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटते का? हिंदी आणि इंग्रजीत का बोलत आहात? मराठी भाषिकांना माझं पटत असेल, तर या बाईंना अनस्बसक्राईब करा…म्हणजे यांनाही कळेल. जय महाराष्ट्र डिसलाइक या व्हिडीओला…” अशी कमेंट केली आहे. यावर अमृताने कमेंट करत तिची बाजू मांडली आहे.

हेही वाचा : “तू इतका सेक्सी का आहेस?” चाहतीच्या प्रश्नावर अभिनेता गश्मीर महाजनीचं उत्तर, म्हणाला….

अमृता खानविलकर

अमृता म्हणाली, “अहो…हा प्रायोजित कार्यक्रम आहे. मी फक्त या कार्यक्रमाची निवेदिका आहे.” अभिनेत्रीचं हे उत्तर पाहून संबंधित नेटकऱ्याने तिला मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करा असा सल्ला दिला आहे. दरम्यान, अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या कामाबाबत अशाप्रकारे प्रश्न उपस्थित केले असता ती अनेकदा स्पष्टपणे स्वत:ची बाजू मांडते. लवकरच ती बहुचर्चित ‘कलावती’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress amruta khanvilkar replied to netizen question who trolled her for less use of marathi language sva 00