मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या स्टाईल व फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिने फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी भाषेतही काम केलं आहे. अमृताने आतापर्यंत अनेक हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तिच्या मराठीसह हिंदी चाहत्यांची संख्याही मोठी आहे. पण, बऱ्याचदा अमृताला नेटकरी ट्रोल करतात. तिची फॅशन किंवा स्टाइल आवडली नाही, तर तिला ट्रोल केलं जातं. यावर तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
अलीकडेच अमृता खानविलकरने ‘पटलं तर घ्या with Jayanti’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिच्याबरोबर ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत देखील होता. या शोमध्ये ओम व अमृताने अनेक विषयांवर गप्पा मारल्या. या भागाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यात अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यासह सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलली आहे.
प्रोमोमध्ये ओम व अमृता यांनी आपण बर्गर बडीज असल्याचं सांगितलं. तसेच ‘माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत कधीच डान्स करताना पाहिलेलं नाही,’ असं अमृता सांगते. यावेळी तिला ट्रोलर्सना एका वाक्यात सांगायचं असेल तर काय सांगशील? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृताने ‘खूप वेळ आहे तुमच्याकडे’, असं उत्तर दिलं.
अमृताने फक्त चार शब्दांत ट्रोलर्सच्या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे. दरम्यान, मराठीतील आघाडीची अभिनेत्री असलेली अमृता आणि आदिपुरूषचा दिग्दर्शक ओम राऊत दोघेही चांगले मित्र आहेत. या मुलाखतीत दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं.