आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. ती तिच्या कामाच्या अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करते. इतकंच नाही तर ती आयुष्यातील आनंदाच्या क्षणाचेही फोटो पोस्ट करत असते. पण अनेकदा तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. याच ट्रोलिंमबद्दल तिने पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे.

अमृताने फेसबुकवर पोस्ट लिहून घाणेरड्या कमेंट्स व ट्रोलिंगबाबत तिचं मत मांडलं आहे. “आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल …. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार …. नवीन मनोकामना …. नवी स्वप्ने … देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार ….
जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्या सारखीच मीसुद्धा आहे, मी ही हेच केलं …. कारण मी हि फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे…. संस्काराने मराठी आहे….मूळची कोंकणातील… पण जन्म मुंबईचा आहे…. मीही कोणाची तरी मुलगी आहे… बहीण आहे…. मावशी आहे…. ताई आहे…. मैत्रीण आहे…. बायको आहे…. आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे.
तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळ्या मुलाखती देत आहे…. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर …. आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे… पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते…. वेषभूशा असो… हसणं असो.. बोलणं असो…एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती…किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये? जे लोक स्वतःचं खरं नाव किंवा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात? मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे…. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये …. पण यावर जे तुम्ही लिहिता… बोलता…. ह्यातून फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात.. असो.. मी नॉर्मली या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच …. पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे. – अमृता खानविलकर,” अशी पोस्ट अमृताने केली आहे.

Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”

अमृताच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट्स करून तिला अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे. ‘बोलणारा त्यातून आपली लायकी आणि संस्कारच दाखवतो, प्रत्येक गोष्ट स्त्री शरीराशी अथवा तत्सम गोष्टींशी जोडणे ही विकृती आहे रोग आहे,प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष, कारण मुर्खाशी संवाद होऊ शकत नाही, मराठी रसिकांना तुझा अभिमान आणि कौतुक आहे, शृंगार हा कलेचा भाग आहे, खरा रसिक सर्व जाणतो,’ ‘काही लोकांची, विरोधाला विरोध ही मानसिकता असते,’ अशा कमेंट्स अमृताच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.