मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केली. अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगणाही आहे. वाजले की बारा, चंद्रा या गाण्यांमधून तिने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. मराठी चित्रपटांबरोबरच अमृताने हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.

अमृताने नुकतंच प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अमृताने तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअरबाबत भाष्य केलं. “हिंदी चित्रपटात करिअर सुरू ठेवायला हवं होतं, अशी खंत वाटते का?” असा प्रश्न मुलाखतीत अमृताला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली “हो, खंत अशी नाही पण सुरुवातीला मी खूप घाबरायचे. मला भीती वाटायची. हिंदी भाषेवर माझं प्रभुत्व नव्हतं. त्यामुळे मी हिंदीत काम सुरू केलेलं तेव्हा मला लोक व्हर्नक्युलर(प्रादेशिक भाषा बोलणारी) म्हणायचे. मी चांगली दिसत नाही, तशी फिगर नाही असं मला वाटायचं”.

shashank shende reacted on marathi industry recent situation
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार

हेही वाचा>> ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नावामागील नेमकं रहस्य काय? मालिकेत लवकरच उलगडा होणार

“मी तेव्हा हिंदी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. पण तितकं चांगलं हिंदी मला बोलता यायचं नाही. नंतर मी हिंदी, उर्दू या दोन्ही भाषांचा अभ्यास केला. राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर मी लागोपाठ तीन चित्रपट केले होते. त्यामुळे मला ‘रामूज’ असं संबोधलं जायचं. माझ्याबद्दल असं का छापून येत आहे, हे पहिलं मला कळतचं नव्हतं. एकाच दिग्दर्शकाबरोबर तीन चित्रपट केल्यानंतर असं म्हणतात हे नंतर मला कळलं. त्याकाळी मी खूप घाबरायचे. त्यामुळे मी जास्त प्रयत्नही केले नाहीत. तेव्हा मार्गदर्शन करणारंही कोणी नव्हतं. आता जी अमृता तुम्हाला दिसते, तशी मी तेव्हा नव्हते, या गोष्टीची मला खंत आहे”,असंही अमृता पुढे म्हणाली.

हेही वाचा>> ‘व्हॅलेंटाईन डे’ला गायीला मिठी मारा; केंद्राच्या सल्ल्यानंतर उर्फी जावेदने शेअर केला भाजपा नेत्याचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाली…

अमृताने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कट्यार काळजात घुसली, नटरंग, चंद्रमुखी, गोलमाल या चित्रपटांमधून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. राझी, सत्यमेव जयते, मलंग या हिंदी चित्रपटांत अमृता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

Story img Loader