अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी अमृता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचमागचं कारणही तितकंच खास आहे. अमृताच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. तिने सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त करत याबाबत माहिती दिली. पण ही सगळी धडपड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचं आता समोर आलं आहे.

आणखी वाचा – Video : मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”

अमृता आणि दिग्दर्शक-अभिनेता संदेश कुलकर्णीचं २००३मध्ये लग्नसोहळा पार पडला. आता या दोघांच्या लग्नाला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाला १९ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृताने गोड बातमी दिली आहे असं चाहत्यांसह सेलिब्रिटी मंडळींनाही वाटलं. पण तिने दुसरी पोस्ट शेअर केल्यानंतर या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची प्रेग्नेंसी टेस्ट सकारात्मक आली असल्याचं दिसत आहे. अमृताने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “आता आश्चर्यकारक सुरुवात.” तसेच गरोदर महिलेचं इमोजीही तिने पोस्टद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – आता अशी दिसते मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री, अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत अमेरिकेमध्ये स्थायिक झाली अन्…

तिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच कलाक्षेत्रामधील मंडळीही कमेंटच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत. पण आता कमेंटच्या माध्यमातून त्यांनाही उत्तर देत मी गरोदर नसल्याचं अमृताने सांगितलं आहे.