अभिनेत्री अनुषा दांडेकर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचा तो अंदाज खूप आवडतो. अनुषाच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असल्याचे दिसतात. परंतु आता तिने केलेल्या एका पोस्टमुळे सर्व जण तिच्याबद्दल खूप काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.

अनुषा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. आता एक पोस्ट शेअर करत नुकतीच गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाल्याचं तिने सांगितलं व सर्व अनुभव किती वेदनादायी आहे, हे सांगत तिने सर्व मुलींना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

आणखी वाचा : Video: सर्फींग करताना पडण्यापासून थोडक्यात वाचली अनुषा दांडेकर, नेटकरी म्हणाले, “आता या वयात…”

अनुषाने तिचा विनामेकअप फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “मी फक्त तुम्हाला सगळ्यांना हॅलो म्हणायला आले आहे. अलीकडेच, माझ्या गर्भाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया झाली आहे. ती गाठ बऱ्यापैकी गंभीर होती. मी भाग्यवान आहे की सर्व काही व्यवस्थित पार पडलं. ही प्रक्रिया चालू असताना, आणखी अनेक गाठी सापडल्या, त्या सर्व डॉक्टरांनी काढल्या आहेत. मला पूर्ण बरं होण्यासाठी अजून थोडे दिवस लागतील पण आता सगळं ठीक आहे.”

हेही वाचा : अभिनेत्री अनुषा दांडेकर लवकरच झळकणार मराठी चित्रपटात, ‘या’ अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

या पोस्टमधून अनुषा दांडेकरने सर्व मुलींना महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. तिने लिहिलं, “मला सर्व मुलींना सांगायचं आहे की तुम्ही नियमित गायनॅकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. दरवर्षी न चुकता तुम्ही गायनॅकॉलॉजिस्टकडून तपासणी करून घ्या. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे लक्ष दिलं जाईल. मी १७ वर्षांची असल्यापासून हे करत आहे.” ही पोस्ट शेअर करत तिने डॉक्टरांचे आभारही मानले. आता या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील तिची मित्रमंडळी तिला काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देत आहे.

Story img Loader