मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून भाग्यश्रीला लोकप्रियता मिळाली. तिच्या बहिणीचा मार्च महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. मधू मार्कंडेय असं तिच्या बहिणीचं नाव आहे. ती अभिनेत्री भाग्यश्रीची मोठी बहीण असून विवाहीत होती. बहिणीच्या आठवणीत भाग्यश्रीने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
फोटोमध्ये भाग्यश्री आणि तिची बहीण दिसत आहेत. दोघी बहिणींचा हा गोड हसरा फोटो शेअर करत भाग्यश्रीने लिहिलं, “तो वेळ पुन्हा रिवाइंड करावा अशी माझी इच्छा आहे! तू मला सर्वात आनंदी ठेवायचीस. तू नेहमी माझ्या हृदयात आहे.” भाग्यश्रीचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्यानंतर तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
तिची बहीण मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचं काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथं मधूला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. मधूला तिची मैत्रीण तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन गेली. तिथून तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे मधूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.