‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री मोटे नावारुपाला आली. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाग्यश्री व तिच्या कुटुंबियांवर काही दिवसांपूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचं निधन झालं. मात्र तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली होती. यासगळ्या प्रकरणामध्ये भाग्यश्री व तिचं कुटुंब मानसिकरित्या खचून गेलं आहे. दरम्यान भाग्यश्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाग्यश्री आता या दुःखामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिने तिच्या कामालाही सुरुवात केली आहे. भाग्यश्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले. याचवरुन तिला ट्रोल करण्यात आलं. बहिणीचं निधन झाल्यानंतरही फोटो पोस्ट करण्यावरुन भाग्यश्रीला सुनावण्यात आलं. या सगळ्या ट्रोलिंगला तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

भाग्यश्री पोस्ट शेअर करत म्हणाली, “बहिणीच्या निधनानंतर आमच्यावर माझा भाचा व भाचीचीही जबाबदारी आहे. मी इतक्या लवकर या सगळ्यामधून कशी काय सावरली? यावरुन मला हिणावणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छिते की, माझं कुटुंब कोणत्या वेदनेमधून जात आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आता मला खूप काही करायचं आहे”.

आणखी वाचा – महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला पुन्हा डेट करतेय जान्हवी कपूर? हात पकडत शेअर केला फोटो, म्हणाली…

“भावनिक नुकसान तर आहेच पण त्याचबरोबरीने मला माझी जबाबदारी आता सांभाळायची आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही मला पाठिंबा द्याल व समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. हा माझ्या आयुष्यामधील खूप कठीण काळ आहे. मी या ट्रोलिंगकडे सकारात्मकतेने पाहू शकत नाही”. भाग्यश्रीने तिला ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.