कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपली मत, नवनवीन व्हिडीओ व फोटो नेहमी शेअर करत असतात. परंतु अनेकदा ते यामुळे ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकतात. असाच काही अनुभव मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिला आला होता. नुकत्याच तिच्या पॉडकॉस्टमधून तिनं हा ट्रोलिंगचा अनुभव सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अभिनेत्री पूजा सावंतची बहीण कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनं ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात कलाकार मंडळी येतात आणि आपला आतापर्यंतचा अनुभव, परखडं मत व्यक्त करतात. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री पूजा सावंत सहभागी झाली होती. यावेळी ट्रोलिंगविषयी बोलत असताना भार्गवी चिरमुले हिनं तिला आलेला अनुभव सांगितला.

भार्गवी म्हणाली की, “आम्ही लहान असताना शाळेत फॅन्टमची गोड सिगारेट मिळायची. त्याची मज्जा अशी होती की, ती सिगारेटसारखी दिसायची आणि त्याला पुढे लाल रंग असायचा. त्यात लहानपणी आई लिपस्टिक लावू द्यायची नाही, मग आम्ही फॅन्टमच्या मागे जे लाल रंगाचं असायचं, त्यानं ओठ लाल करायचो. मी आणि चैत्रू (चैत्राली गुप्ते) असं खूप करायचो. तर ते फॅन्टम आम्हाला खूप वर्षांनी अ‍ॅमेझॉन किंवा पानटपरीवर मिळालं होतं. त्यामुळे आम्ही दोघींनी ती सिगारेट तोंडात घेऊन फोटो काढला होता आणि तो सोशल मीडियावर टाकला होता. त्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, ‘फॅन्टम गोड सिगारेट, जुन्या आठवणी.’ पण त्यावरून आम्हाला लोकांनी खूप ट्रोल केलं. त्या फोटोवरच्या कमेंट पाहून आम्हाला असं झालं की, ती पोस्ट डिलीट करु या. ‘मरा सिगारेट पिऊन,’ असं बरंच काही लिहिलं होतं. “

हेही वाचा – दत्तू मोरेनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘हा’ कलाकार चढणार बोहल्यावर? समीर चौघुले म्हणाले, “लग्न नाही, तर स्वयंवर…”

हेही वाचा – पूजा सावंतच्या कुटुंबीयांना बिल्डिंगमधून हाकलून देण्याची मिळालेली ताकीद, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्रीनेच केला खुलासा

पुढे भार्गवी म्हणाली, “आमचं असं झालं, अरे मरा वगैरे काय? आम्ही फोटोखाली लिहिलं आहे, फॅन्टम गोड सिगारेट आहे. पण लोकांनी ती वाचलीच नाही. त्यावरून आम्हाला खूप घाणेरड ट्रोल केलं होतं.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress bhargavi chirmule was trolled due to these photos with phantom sweet cigarettes pps