मराठी इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे उत्कृष्ट अभिनयाबरोबर डान्सही करतात. पूजा सावंत, अमृता खानविलकर, पुष्कर जोग, उर्मिला कोठारे यांसारखे बरेच डान्सर कलाकार मंडळी आहेत, जे आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. पण एका मराठमोळ्या अभिनेत्री, डान्सरने मराठी इंडस्ट्रीविषयी खंत व्यक्त केली आहे. डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत प्रमुख भूमिका मिळत नसल्याचा दावा तिनं केला आहे.

हेही वाचा – अभिनेता गश्मीर महाजनीचं पुन्हा एकदा ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; म्हणाला, “ते माझं आयुष्य…”

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”

अनेक मालिका, रिअ‍ॅलिटी शो, चित्रपटात ही अभिनेत्री झळकली आहे. या अभिनेत्री नाव आहे मीरा जोशी. मीरानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एका डान्सरला प्रमुख भूमिका का मिळत नाहीत? याविषयी स्पष्टच बोलली आहे.

हेही वाचा – लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळेंचं ‘हे’ आहे कायदेशीर नाव; स्वतः खुलासा करत म्हणाले…

मुलाखतीमध्ये मीराला विचारलं गेलं होतं की, ‘तू आयटम साँग केलेत, तू स्टेज शो करतेस आणि आता तू अभिनय करतेस. जेव्हा तू एखाद्या सेटवर जातेस तेव्हा एक डान्सर म्हणून एका वेगळ्या पद्धतीनं बघितलं जात का?’ यावर मीरा जोशी म्हणाली की, “कास्टिंग होताना कशाप्रकारे विचार केला जातो हे सांगते. मी एक डान्सर आहे. तर ही एक सकारात्मक गोष्ट आहे की, मला डान्सबरोबर अभिनय सुद्धा येतो. या सकारात्मक बाजूचा खरा विचार केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा ९९ टक्के मी पाहिलं आहे, ते पण मराठी इंडस्ट्रीमध्ये हिंदीत नाही. अरे ही तर डान्सर आहे ना, मग हिला आयटम साँग देऊन टाकू या. तुम्हाला कुठल्याही भूमिकेसाठी विचारत घेतलं जात नाही. ती डान्सर आहे म्हणून तिला आयटम साँग लगेच देऊन विषय निपटवायचा, असं केलं जातं.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा व्हिसा झाला होता रिजेक्ट; पृथ्वीकनं सांगितलं कारण, म्हणाला…

“मला असं क्वचित विचारलं गेलं की, तुझ्यासाठी एक आयटम साँगही आहे व भूमिकाही आहे. तू दोन्हीकडे सूट होशील. तुला काय करायला आवडेल? असं मला फक्त एखादं दुसऱ्या माणसानं विचारलं असेल. आयटम गर्ल आहे म्हणून नकारात्मक भूमिका दिली जाते. सकारात्मक भूमिकेसाठी विचारात घेतलं जात नाही. हे मी खूपदा पाहिलं आहे. डान्सर आहे तर आयटम साँग द्या, आयटम साँग करते तर नकारात्मक भूमिका द्या. सकारात्मक, सोज्वळ ज्या आपल्या घरगुती मुली दाखवतात मालिकेत, ज्या प्रमुख भूमिकेत असतात त्याच्यासाठी कोणी विचार करत नाही,” असं मीरा जोशी म्हणाली.

Story img Loader