‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल सुरू आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट अनेक रेकॉर्डस मोडत आहे. आता दीपा चौधरीने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटाची चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरू आहे.  या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय, या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटाने ‘सैराट’ आणि वे’ड’चाही विक्रम मोडला. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने एका दिवशी ६.१० कोटींची कमाई करत एका दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. आता चित्रपटाच्या या यशावर दीपाने प्रतिक्रिया दिली आहे.

marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
Akola man plucked the dead peacock feathers from the Road and took them Home the video w
VIDEO: “देवा सुंदर जगामंदी का रं माणूस घडविलास” मृत्यूनंतरही यातना संपेना..लोकांनी मेलेल्या मोराबरोबर काय केलं पाहा
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ
Loksatta editorial Loksatta editorial on symbolic changes in new lady of justice statue by supreme court
अग्रलेख: न्यायदेवता… न्यायप्रियता!

आणखी वाचा :

या चित्रपटाने एका दिवशी केलेल्या सर्वाधिक कमाईचा आकडा शेअर करत तिने लिहिलं, “रसिकहो.. आपण हा विक्रमः सुध्दा आपल्या नावे केलात! मनापासून अभिनंदन. तुम्ही ठरवाल तेच होणार. पण एक सांगू? याचा अभिमान नक्कीच आहे… तरीही येणाऱ्या कुठल्याही नव्या मराठी सिनेमाने हा विक्रम लवकरात लवकर मोडावा हीच स्वामी चरणी प्रार्थना.. यानेच मराठी सिनेमा झंझावात निर्माण करेल.”

हेही वाचा :

दीपाची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर प्रतिक्रिया देत नेटकरी हा चित्रपट खूप आवडल्याचं सांगत आहेत. दरम्यान, हा चित्रपट म्हणजे सहा बहीणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.