बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. जिनिलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिनिलियाने नुकतंच एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या रिलमध्ये सुरुवातीला जिनिलियाही पुरुष आणि महिलांबद्दल बोलताना दिसत आहे. “पुरुष गाडी चालवतात, दुचाकी चालवतात, जहाज चालवतात, विमान चालवतात, पण मग आम्ही बिचाऱ्या महिलांनी तोंडही चालवू नये”, असे जिनिलिया यात बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : “माझ्या शिवबा राजं वर…” संतोष जुवेकरने व्यक्त केली मनातील मोठी इच्छा

जिनिलियाने हा व्हिडीओ शेअर करताना त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. “रिल हे फक्त मजा-मस्तीसाठी आहे. पण हे गंभीरपणे लक्षात ठेवा. स्त्रियांनो हे खरं आहे”, असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे.

दरम्यान रितेश आणि जिनिलियाने हे दोघेही बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचा वेड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.