जिनिलीया देशमुख ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिनिलीयाने हिंदीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. २०१२मध्ये रितेश देशमुखशी विवाहबंधनात अडकून जिनिलीया देशमुख घराण्याची सून झाली. लग्नानंतर जिनिलीयाने घर आणि मुलांच्या संगोपनावर लक्ष दिलं. त्यानंतर मात्र तिने वेड या मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. सध्या ती ट्रायल पिरीयड या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच जिनिलीयाने लोकसत्ता या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचा सिनेसृष्टीतील संपूर्ण प्रवासाबद्दल भाष्य केले. यावेळी तिला देशमुखांची सून झाल्यानंतर करिअरमध्ये काही बदल करावा लागला का? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझ विवाहबद्ध? पतीचे नाव ते लग्नाची तारीख; सर्व माहिती आली समोर

“माझं शिक्षण वांद्र्याच्या सेंट कॅरॅमल कॉन्व्हेंट -सेंट अँड्र्यूज कॉलेजमध्ये झालं. वांद्र्यात हिंदी -इंग्रजी असं हिंग्लिश कल्चर होतं. तिथलं बेधकड आणि फटकळ वातावरण माझ्यात मुरलं होतं. पण हो, त्या फटकळपणात कोणचाही पाणउतारा करणं, कोणाचं मन दुखावणं ही वृत्ती नव्हती.

पण लग्नानंतर माझं जीवन एकदमच बदलून गेलं. जबादारीनं वागण्याची वृत्ती खोलवर रुजत गेली. माझ्यातल्या बेधडक -बिनधास्तपणाला एक जबाबदारीची, परिपक्वतेची झालर आली. आवशक्य तिथेच बोलावं, अन्यथा गप्प बासावं, हे लक्षात आलं. मी आता फटकळपणे बोलत नसले तरी, बोलण्यातला सडेतोडपणा आजही कायम आहे”, असेही जिनिलीयाने म्हटले.

“स्क्रीनवर शॉट देताना मी कम्फर्टेबल असलं पाहिजे हे एक मनाशी ठरवलं होतं. माझे शॉट कसे आहेत कुणासोबत आहेत, ते कसे द्यायचे आहेत, याबाबत मी दिग्दर्शकांशी आधीच चर्चा करते. मी दिग्दर्शकाला हवा तसा शॉट दिला नाही म्हणून मी स्वत:ला दोषी समजत नाही.

याबरोबरच दिग्दर्शकाला हवा तसा शॉट घेतल्याचं समाधानही मिळायला हवं. चित्रपट किंवा ओटीटी माध्यमात काम करणं ही माझी आर्थिक गरज नाही. अभिनय हा कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा चेहरा, त्यांचं पॅशन असतं, मग वाट्टेल त्या तडजोडी करत अभिनय का करावा? मला मी रितेशची पत्नी, देशमुखांची सून असल्याचा सार्थ अभिमान आहेच, पण त्याचा अभिनयाशी काही थेट संबंध नाही. माझी काही तत्त्वं पूर्वीपासूनच आहेत आणि मी त्या तत्त्वांशी आणि स्वत:शी प्रामाणिक आहे हे अधिक महत्त्वाचं आहे”, असे जिनिलीयाने सांगितले.

आणखी वाचा : “हे वय होतं का सोडून जायचं…”, किरण मानेंची भावुक पोस्ट, म्हणाले “नंतर कधीतरी याच हायवेवर…”

दरम्यान, रितेश-जिनिलीया ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. रितेशने अलीकडेच त्याच्या बहुचर्चित ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे, जिनिलीयाचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट २१ जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress genelia deshmukh talk about changes after married with riteish deshmukh nrp
First published on: 06-08-2023 at 17:47 IST