मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख. या दोघांना एकत्र पाहायला सगळ्यांना खूप आवडतं. सोशल मीडियावर दोघं खूप सक्रिय असतात. अनेकदा फोटो, मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. याशिवाय स्वतःची परखड मत देखील व्यक्त करत असतात. आज रितेश व जिनिलीयाचा धाकटा मुलगा राहीलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिनिलीयाने एक खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये गुरू रंधावाच्या गाण्यावर रणवीर सिंहने ओरीला उचलून घेतलं अन्…, पाहा व्हिडीओ

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

अभिनेत्री जिनिलीया देशमुखने लेक राहील बरोबरचा एक व्हिडीओ शेअर करून ही खास पोस्ट लिहिली आहे. या व्हिडीओत, जिनिलीया राहीलला उचलून घराबाहेर फेऱ्या मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे, “ते म्हणतात ना तुमचं दुसरं मूल अगदी तुमची हुबेहूब प्रतिमा असते. ते बाकी खरं आहे. मजेशीर, उत्साही, खंबीर आणि परिपूर्ण म्हणजे हे मूल. ते नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देणारं सर्वात मोठं प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. शिवाय तुम्हाला ते जेवढं एक पालक म्हणून कठोर बनवतात तेवढीच त्यांच्यात तुम्हाला तुमच्या सर्वात वाईट दिवसांत आनंदी ठेवण्याची क्षमता असते.”

“माझे जे काही आहे ते तूच आहेस. मला आशा आहे की, जेव्हाही तुला माझी गरज भासेल तेव्हा तुला साथ देण्याची ताकद माझ्याकडे असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…”, अशी सुंदर पोस्ट लिहून जिनिलीयाने राहीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – श्रेयस तळपदे व संकर्षण कऱ्हाडेच्या भेटीमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ २’च्या चर्चांना उधाण, भेटीमागचं नेमकं कारण काय? वाचा…

हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेतील आदित्यने खऱ्या बायकोसाठी केला खास पदार्थ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझा सॉलिड शेफ”

जिनिलीयाच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी राहीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री जिया शंकर, मुश्ताक शेख अशा बऱ्याच कलाकारांनी राहीलला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच “तू सर्वोत्कृष्ट आई, पत्नी आणि अभिनेत्री आहेस”, “राहील वाढदिवसाच्या शुभेच्छा”, “खूप सुंदर”, “तू जे दुसऱ्या मुलाबद्दल लिहिलं आहेस, ते खरं आहे. देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असू दे”, अशा समिश्र प्रतिक्रिया जिनिलीयाच्या पोस्टवर उमटल्या आहेत.

Story img Loader