अभिनेत्री हेमांगी कवीने नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून बिनधास्तपणे आपलं मत मांडताना दिसते. सध्या नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर करण्यात येत आहे. यानिमित्ताने अलीकडच्या काळात प्रत्येक स्त्रीने खंबीरपणे आपलं आयुष्य जगलं पाहिजे असं आवाहन हेमांगीने समस्त महिलावर्गाला केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ कायम! आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, शिल्पा नवलकर म्हणाल्या…

हेमांगी कवीने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत स्त्रियांच्या समस्यांविषयी स्पष्ट मत मांडत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अनुभव सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना, सेटवर महिलांना अनेक अनुभव येत असतात. माझ्या सुरक्षेसाठी काहीवेळा मला कायदा हातात घ्यावा लागला. याबद्दल सांगायचं झालं, तर कळवा स्टेशनवर एक जण माझ्या मानेला हात लावून गेला. त्या क्षणाला मी त्याच्या कॉलरला पकडून त्याला एक लगावून दिली.”

हेही वाचा : Video : नव्याकोऱ्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! ‘एकदा येऊन तर बघा’चा दमदार टीझर प्रदर्शित, तब्बल १६ विनोदवीर खळखळून हसवणार

अभिनेत्री पुढे म्हणाली, “तो प्रसंग घडल्यावर मी त्या माणसापासून स्वत:चं रक्षण जरुर केलं. पण, पुढे जाऊन मला मी कायदा हातात घेतला याची जाणीव झाली… पण, त्या क्षणाला स्वत:चं रक्षण करणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. माझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर, मी थेट क्या है… असं विचारते.”

हेही वाचा : केदार शिंदेंच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस! ‘तो’ फोटो शेअर करत सनाला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “एकच लक्षात ठेव…”

“जिथल्या तिथे जाब विचारल्यावर माणसं लाजतात याउलट काही माणसं निर्लज्जपणे तशीच कृती पुन्हा करतात. पण, यावर गप्प बसणं हा उपाय नाही. मी आधीही पटकन रिअ‍ॅक्ट करून समोरच्याला जाब विचारायचे आताही तेच करते” असं हेमांगी कवीने सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर हेमांगीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अलीकडेच एका जाहिरातीसाठी तिने काम केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress hemangi kavi recalls someone touches her neck at kalwa railway station after that she fights back sva 00