अभिनेत्री हेमांगी कवी मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमधून नाटकांमधून चित्रपटांमधून ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर आता लवकरच ती क्रिकेटपटू युवराज सिंगबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेमांगीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती ही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स देण्याबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तर आता तिने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : “नवीन फुटवेअर घे, सारखे तेच दिसत आहेत…,” हेमांगी कवी ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली…

हेमांगी कवी हिने नुकतेच युवराज सिंगबरोबर काढलेले काही फोटो शेअर केले आणि ती लवकरच त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याची माहितीच्या त्यांना दिली. या फोटोमध्ये ती मासे विकणाऱ्या स्त्रीच्या वेशभूषेत दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “काय हँडसम आणि आनंददायी व्यक्ती आहे!” याबरोबरच ती युवराज सिंगबरोबर एक जाहिरात शूट करत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

हेही वाचा : “काहीपण लिहायचं आणि….,” नेटकऱ्याच्या कमेंटवर हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

तर आता हेमांगीने शेअर केलेले हे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत असून तिच्या या नवीन कामाबद्दल तिचे चाहते उत्सुकता व्यक्त करत आहेत.

Story img Loader