‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे अभिनेत्री ऋता दुर्गुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ऋता तिच्या ‘सर्किट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ऋताचा पती प्रतिक शाहही याच क्षेत्रामध्ये आहे. तो एक दिग्दर्शक आहे. खरं तर ऋताचा लग्नानंतर पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. करिअरच्या ऐनमोक्यावर तिने लग्न करण्याचा निर्णय का घेतला? याबाबत ऋताने भाष्य केलं आहे.
ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. बऱ्याच अभिनेत्री अगदी उशीराने लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र ऋताने लवकर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. याचाबाबत ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ऋताने भाष्य केलं. ती म्हणाली, “मला योग्य तो जोडीदार मिळाला. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी आहे. माझे आई-वडील मला सारखे विचारायचे की, अगं तू लग्न कधी करणार?”
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
“करोनामुळे मला जरा दोन वर्ष लग्न न करण्याचं कारण मिळालं. नशिबाने मला सोन्यासारखा जोडीदार मिळाला आहे. तरीही सुरुवातीला मी त्याला लग्नासाठी बऱ्याचदा नकार कळवला. मी लग्नावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. एकाच रिलेशनशिपवर ठाम असणारी मुलं मला आवडतात. तसाच प्रतिक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी त्याला फोन करत असते”.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
“माझ्या आई-बाबांमध्ये एक वेगळं नातं मी पाहिलं आहे. मलाही अगदी तसंच नातं लग्नानंतर माझ्यामध्ये व माझ्या नवऱ्यामध्ये हवं होतं. ते मला मिळालं. लग्नाचा निर्णय घेतला म्हणून माझ्या करिअरवर काही त्याचा परिणाम होईल असं मला कधीच वाटलं नाही. लग्नानंतर माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात प्रतिकही याच क्षेत्रामध्ये काम करणारा आहे. तो एक दिग्दर्शक आहे. त्यामुळे आमचं नातंही छान आहे”. ऋता व प्रतिक अगदी सुखाचा संसार करत आहेत.