ऋता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋताने अनेक नाटक मालिका व चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाच्या जोरावर ऋताने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची क्रश असलेली ऋता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या ऋताने शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
ऋताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांचे नाव, मोबाईल नंबर व शहराचे नाव ही माहिती मागवली आहे. ऋताच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ऋता लवकरच नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबाबत ऋताने ही पोस्ट शेअर केली आहे. ऋताच्या या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार असून यासाठी ऋताने चाहत्यांकडून त्यांची माहिती मागवली आहे.
हेही वाचा>> रितेश आणि आदिलच्या आधी राखी सावंतला करायचं होतं ‘या’ व्यक्तीशी लग्न, स्वत:च केलेला खुलासा
हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…
“हाय फ्रेंडस, माझा एक नवा मराठी सिनेमा लवकरच येतोय आणि त्यासंदर्भात तुम्हा सगळ्यांना एक धमाल सरप्राईज द्यायचंय! त्या सिनेमाचं नाव, रिलीज डेट तुम्हाला एकदम पर्सनलमध्ये सांगायचंय…! माझ्या या नव्या फिल्मची announcement मी नाही तर मायबाप प्रेक्षकांनी म्हणजे तुम्ही करावी अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे. आहे की नाही कमाल!! तुम्हाला ते टीझर हवं असल्यास मला खाली दिलेल्या आयडीवर ताबोडतोब मेल करा. मला टॅग करुन तुम्ही लाँच करा माझ्या नव्या सिनेमाचे टीझर…ईमेलमध्ये या गोष्टी मेन्शन करा…तुमचे संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे शहर”, असं ऋताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> गायक अरमान मलिकला दोन बायका असलेल्या युट्यूबरच्या पत्नीने सुनावलं, म्हणाली “माझ्या नवऱ्याची…”
छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरात पोहोचली. ‘मन उडू उडू झालं’, ‘दुर्वा’ या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. ‘टाइमपास ३’, ‘अनन्या’ या चित्रपटांतही ऋता झळकली आहे.