मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे कायमच चर्चेत असते. समाजातील अनेक गोष्टींवर केतकी तिचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसते. तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. सध्या केतकीने केलेल्या अशाच एका पोस्टची चर्चा आहे.

केतकीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. “समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच” , असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
India’s culture encourages diversity in practice and thought.
चलनी नोटा, वस्त्राचा तुकडा आणि भारतीय थाळी विविधतेत एकतेचं प्रतीक कसं ठरतात?

हेही वाचा>> Bigg Boss Marathi: विकास सावंत घराबाहेर पडताच ढसाढसा रडले किरण माने; भावूक होत म्हणाले “ईक्या लेका…”

पुढे ती म्हणते, “एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे”.

हेही वाचा>>“…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

ketaki chitale post

“चार पैश्यात घोषणा करा. जातीयवाद निर्माण करा. सनातनी हिंदू झोपला आहे, याचा फायदा घ्या. जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका. पण लक्षात असू द्या…झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो”, असंही केतकीने म्हटलं आहे. त्यानंतर काही वेळाने केतकीने तिची इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या मुलांनाही पाहायचा नाही ‘पठाण’, ‘या’ चित्रपटासाठी उत्सुक; अभिनेत्यानेच केला खुलासा

‘आंबट गोड’ मालिकेतून केतकी घराघरात पोहोचली. तिने अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावं लागलं होतं.

Story img Loader