अभिनेत्री किशोरी शहाणे या मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने ९० चं दशक गाजवलं. आतापर्यंत त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. तर मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

आणखी वाचा : “मला अजूनही वाईट वाटतं…” सुपरहिट ‘अशी ही बनवाबनवी’ला किशोरी शहाणेंनी दिला होता नकार, कारण देत म्हणाल्या…

किशोरी शहाणे त्यांच्या कामामुळे तर नेहमी चर्चेत असतातच, पण याचबरोबर त्या त्यांच्या फिटनेसमुळेही नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. वयाच्या ५५ व्या वर्षी देखील त्या फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. आता त्यांनी फिटनेससाठी त्यांच्या चाहत्यांना खास टिप्स दिल्या आहेत.

हेही वाचा : किशोरी शहाणेंनी ‘ते’ एक वाक्य म्हणताच थेट लग्नाला तयार झाले दिपक विज; जाणून घ्या अभिनेत्रीची रंजक लव्ह स्टोरी

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये निरोगी आयुष्य राखण्यासंदर्भात टिप्स देताना त्या म्हणाल्या, “मी खाण्यापिण्याच्या संदर्भातल्या टिप्स नक्की देईन. जंक फूड खाऊ नका, शक्य असेल तितकं घरचं जेवण जेवा. जास्तीत जास्त पाणी प्या. आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस तुम्हाला आवडेल त्या प्रकारचा व्यायाम करा. मेहनत करा, म्हणजे तुम्हाला जे हवं ते नक्की तुम्हाला मिळेल.” तर आता त्यांनी दिलेल्या या टिप्स चर्चेत आल्या आहेत.