‘कोंबडी पळाली’ या गाण्याचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अभिनेत्री क्रांती रेडकरचं नाव येतं. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व दिग्दर्शिका म्हणून तिला ओळखलं जातं. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध रील्स शेअर करून आणि जुळ्या मुलींचे किस्से सांगत अभिनेत्री आपल्या सर्व चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलाविश्वात यश मिळाल्यावर वैयक्तिक आयुष्यात २०१७ मध्ये क्रांतीने सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला झिया आणि झायदा अशा दोन मुली आहे. क्रांती या दोघींनी प्रेमाने छबील आणि गोदो अशी हाक मारते. या दोघींची जोडी सोशल मीडियावर हिट आहे. अभिनेत्री तिच्या लाडक्या लेकींचे भन्नाट किस्से नेहमीच सोशल मीडियावर सांगत असते. मुली झाल्यावर काही काळ क्रांतीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. याचसंदर्भात अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला आहे. पण, चाहत्याला उत्तर देताना क्रांतीने सर्वात आधी त्याचं व्याकरण सुधारलं आणि त्यानंतर आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचा : फोटोतील ‘या’ अभिनेत्रींना ओळखलंत का? दोघी आहेत रुममेट्स, नुकत्याच नव्या घरात झाल्या शिफ्ट

क्रांतीच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने “तुम्हाला चित्रपट ‘भेटत’ नाही का?” असा प्रश्न विचारला होता. मुळात माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात हे आता सर्वश्रूत आहे. तरीही प्रश्न विचारताना या संबंधित नेटकऱ्याने व्याकरणाची चूक केली होती. अर्थात क्रांतीने या युजरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी त्याने केलेली व्याकरणाची चूक सुधारली. त्यानंतर या नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

“चित्रपट ‘भेटत नाही’, ‘मिळतो’ आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे…मला कधी कधी चित्रपट मिळत नाहीत आणि कधी कधी मिळतात. पण, सध्या माझ्या दोन्ही मुली लहान आहेत. त्यामुळे अनेकदा माझ्या शूटिंग तारखा जुळत नाहीत. आता येत्या काळात मी काही चित्रपट करत आहे. ते लवकरच प्रदर्शित होतील” असं सरळ सोप्या शब्दात उत्तर देत क्रांतीने तिची बाजू या नेटकऱ्यासमोर मांडली आहे.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’ची नवीन मालिका ‘या’ दिवशी होणार सुरु, ‘लाखात एक आमचा दादा’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

क्रांती रेडकरने चाहत्याला दिलं उत्तर

दरम्यान, क्रांतीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ अशा बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांमध्ये क्रांतीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘कांकण’ चित्रपटाचं दिग्दर्शन क्रांती रेडकरने केलं होतं. यामध्ये जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kranti redkar replied to netizen who asked her about upcoming movie and work sva 00