क्रांती रेडकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २०१७ मध्ये क्रांतीने सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबरोबर लग्न केलं. अभिनेत्री प्रत्येकवेळी आपल्या नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. क्रांतीने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’च्या सायलीचं वर्चस्व कायम, जुई गडकरीने शेअर केली पोस्ट, पाहा संपूर्ण TRP यादी…

समीर वानखेडे सरकारी अधिकारी असल्याने ते अनेकदा घरापासून दूर राहून त्यांचं कर्तव्य बजावतात असतात. अशावेळी क्रांती संपूर्ण घर जबाबदारीने सांभाळते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत समीर वानखेडेंनी बायकोचा उल्लेख ‘माझ्या घरची दुर्गा’ असा केला होता. आता क्रांतीने कामावर निघालेल्या समीर वानखेडेंचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “मी प्रचंड दडपणात असताना दीपिकाने…”, वैभव तत्त्ववादीने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवरील किस्सा

अभिनेत्रीने या व्हिडीओला, “देशसेवेसाठी तुम्ही अनेक दिवस बाहेर असता याचा मला कधीच त्रास होणार नाही फक्त, मला तुमची प्रचंड आठवण येते.” असं कॅप्शन दिलं आहे. क्रांतीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “समीर वानखेडे सर खरे हिरो आहेत”, “समीर सर आम्हाला प्रेरणा देतात”, “तुम्हा दोघांना कोणाची नजर न लागो”, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : “एखाद्या चांगल्या गायकाकडून लोकांना ह्या अपेक्षा नसतात…,” अमेरिकेतून शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल देशपांडे ट्रोल

दरम्यान, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केलं. आज या जोडप्याला झिया आणि जायदा नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती या दोघींचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kranti redkar shared romantic video for husband sameer wankhede sva 00