अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहेच पण याबरोबरच मराठी सिनेसृष्टीबरोबर असलेलं तिचं नातं ती वेळोवेळी जपत असते. तर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने एक मोठी घोषणा केली आहे.

गेली अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वांची ही धक धक गर्लने काही वर्षांपूर्वी बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली. तर आतापर्यंत तिने एका मराठी चित्रपटाची ही निर्मिती केली आहे. त्या पाठोपाठ आता आज तिने ती निर्मित करत असलेल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली.

आणखी वाचा : माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी आज या आगामी चित्रपटाचं एक मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. ‘पंचक’ असं या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा : Video: हिरवी पैठणी, नाकात नथ अन्…; माधुरी दीक्षितची ‘झी मराठी अवॉर्ड्स’ला हजेरी, अभिनेत्रीच्या नम्रपणाचं होतंय कौतुक

तर याआधी माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी मिळून ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी निर्मित केलेला तो पहिलाच मराठी चित्रपट होता. तर त्यानंतर आता त्यांनी ‘पंचक’ हा ते निर्मित करत असलेल्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते देखील या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवत असून या चित्रपटाबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader