आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मालिका, चित्रपटांमधील अभिनयाच्या जोरावर मानसीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतचं एका मुलाखतीत मानसीने तिच्या पहिल्या मानधनाबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- अभिनेता संतोष जुवेकरला साकारायची आहे ‘ही’ भूमिका; म्हणाला, “आत्तापर्यंत मी…”
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिच्या करिअरबरोबरच तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. तुझं पहिलं मानधन किती असा प्रश्न मानसीला विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना मानसी म्हणाली, “मला पहिलं मानधन म्हणून ५०० रुपये मिळाले होते. मी त्यावेळेस गश्मीर महाजनीबरोबर लीड म्हणून डान्स केला होता. त्यावेळेस मी अभिनय क्षेत्रात आले नव्हते.”
दरम्यान मानसी नाईक ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती कायमच तिच्या खासगी, वैवाहिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दलच्या पोस्ट शेअर करताना दिसते. तसेच ती अनेक रिल्सही बनवताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच मानसीने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले होते. मानसीच्या या निर्णयानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते.