मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हे सर्वगुण संपन्न असतात हे म्हणायला काही वावग ठरणार नाही. मराठी कलाकार मालिका, चित्रपट, नाटक, वेब सीरिज गाजवतातच. पण डबिंग क्षेत्रातही बऱ्याच मराठी कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्लॉकबस्टर ठरलेला ‘बाहुबली’ असो किंवा ‘पुष्पा’ यांसारख्या अनेक चित्रपटातील प्रमुख भूमिकांना मराठी कलाकारांनी आवाज दिला आहे. त्याचप्रमाणे ‘पानिपत’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाजही एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं दिल्याचा नुकताच खुलासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर ‘त्या’ रात्री लेक अभिनयची ‘ती’ कृती पाहून प्रिया बेर्डेंना मिळाली प्रेरणा; किस्सा सांगत म्हणाल्या…

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा चित्रपट २०१९ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बरेच मराठी कलाकार होते. रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी, मिलिंद गुणाजी, दुश्यंत वाघ अशा अनेक मराठी कलाकार मंडळी या चित्रपटात झळकले होते. अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता अर्जुन कपूर हे प्रमुख भूमिकेत होते. सदाशिवराव भाऊ आणि पार्वती बाईंची भूमिका दोघांनी साकारली होती. चित्रपटातील क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर मीरा जोशीनं दिला होता. याचा नुकताच खुलासा तिनं स्वतः एका मुलाखतीमधून केला.

हेही वाचा – एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं शिक्षण माहितेय? जाणून घ्या

‘कलाकार बाय मिरियड आर्ट्स’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मीरा विचारलं गेलं की, ‘अभिनय, डान्स हे सर्व सुरू असतानाच डबिंग मधेच कुठून आलं?’ त्यावर ती म्हणाली की, “ती योगायोगानं संधी मिळाली. मी एका ऑडिशनला गेले होते, जिथे माझं पुढे काम झालं नाही. पण तिथे असलेल्या एका व्यक्तीनं माझा आवाज ऐकला होता. तर त्यानं मला सांगितलं, तू डबिंगच्या एकदा फक्त टेस्टला ये. तर मी विचारलं की, डबिंगची टेस्ट काय असते? कारण मला काहीच माहित नव्हतं. ते म्हणाले, एका चित्रपटाचं फक्त डबिंग करायचं आहे. मग मी म्हटलं, ठीक आहे, एखादा सीन वगैरे असेल.”

हेही वाचा – “डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत…”, अभिनेत्रीने खंत व्यक्त करत सांगितला अनुभव, म्हणाली…

“त्यानंतर त्यांनी मला ‘पानिपत’चा एक सीन डबिंगसाठी सांगितला. मी तोही केला. पण मला तेव्हा माहित नव्हतं की, ‘पानिपत’साठी डबिंग करायचं आहे. मला वाटलं, असाच कुठलाही सीन दिला असेल. हे झाल्यानंतर मला पाच-सहा दिवसांनी कॉल आला की, ‘पानिपत’ चित्रपटातील कृति सेनॉनसाठी मराठीमध्ये आवाज द्यायचा आहे. तू करशील का? तर मी म्हटलं, हो, मला आवडेल. खरंतर प्रमुख भूमिका असेल तर डबिंगसाठी दोन-तीन दिवस लागतात. पण आमचं एकाच दिवसात काम झालं होतं,” असं मीरा म्हणाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress meera joshi gave the marathi voice of kriti sanon in the movie panipat pps
First published on: 16-08-2023 at 16:32 IST