छोट्या पडद्यावरील ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकांमुळे अभिनेत्री मिताली मयेकर घराघरांत लोकप्रिय झाली. मितालीने वैयक्तिक आयुष्यात २०२१ मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर लग्नगाठ बांधली. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच तिच्या बाली ट्रिपचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. यंदाच्या वर्षात मिताली स्पेन, फ्रान्स, इंडोनेशिया, बँकॉक असे अनेक देश फिरण्यासाठी गेली होती. २०२३ मध्ये केलेल्या जगभ्रमंतीच्या खास आठवणी मितालीने एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.

हेही वाचा : “Happy Birthday बायको”, विराजस कुलकर्णीची पत्नी शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट, लग्नातील फोटो शेअर करत म्हणाला…

Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
Raveena Tondon And Govinda
“…तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते”, गोविंदा व रवीना टंडनबाबत सुनिता आहुजा म्हणाल्या, “मी तिला सांगितले…”

मितालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्काय डायव्हिंग, निळेशार समुद्रकिनारे, जगभरातील खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. तिच्या मित्र-मैत्रिणींनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याउलट एका नेटकऱ्याने मितालीच्या या व्हिडीओवर नकारात्मक कमेंट केली होती.

हेही वाचा : ‘असं’ आहे भुवनेश्वरी आणि अक्षरामधील ऑफस्क्रीन नातं! पोस्ट शेअर करत कविता मेढेकर म्हणाल्या, “कितीही वाईट वागले तरीही…”

“पैसे कुठून येतात…ना चित्रपट, ना मालिका?” असा प्रश्न एका नेटकऱ्याने कमेंट सेक्शनमध्ये उपस्थित केला होता. या प्रश्नावर मितालीने “झाड लावलंय. तुला हव्यात बिया?” असं सडेतोड उत्तर दिलं आहे. यापूर्वी बालीच्या समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घातल्यामुळे मितालीच्या लूकवर काही जणांनी नाराजी दर्शवली होती. तेव्हा सुद्धा अभिनेत्रीने अशाचप्रकारे उत्तर देत ट्रोलर्सला सुनावलं होतं.

हेही वाचा : ४ हजारांसाठी राष्ट्रपतींसमोर लालकृष्ण अडवाणींशी भांडलेले विधू विनोद चोप्रा; संतापलेले अडवाणी म्हणालेले, “तुझ्या वडिलांना…”

mitali mayekar
मिताली मयेकर

दरम्यान, मिताली मयेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, मिताली आणि सिद्धार्थ चांदेकरची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांच्याही लग्नाला येत्या जानेवारी महिन्यात ३ वर्ष पूर्ण होणार आहेत.

Story img Loader