बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आयरा ३ जानेवारी २०२४ला लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आमिरने स्वतः काही दिवसांपूर्वी दिली होती. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर दोघांचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासून आयरा कधी लग्नबंधनात अडकते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आयरा आयुष्याच्या नव्या प्रवासाला नुपूरबरोबर सुरुवात करणार आहे. आमिर खानचा होणार जावई हा एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फिटनेस ट्रेनर आहे.
आमिर खानचा जावई नुपूर शिखरे पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहेत. Fitnessismची सुरुवात त्याने केली आहे. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय त्याने दशकभर तो सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. असा हा लोकप्रिय फिटनेस ट्रेनर आणि आमिरचा जावई अभिनेत्री मिथिला पालकरचा देखील फिटनेस ट्रेनर आहे. याचा खुलासा मिथिलाने केलेल्या एका पोस्टमुळे झाला आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. ज्यामध्ये मिथिला शीर्षासन करताना दिसत आहे. तसेच तिला शीर्षासन करताना नुपूर मदत करताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात आयरा आणि नुपूरचा केळवणाचा कार्यक्रम झाला होता. या केळवणाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी अभिनेत्री मिथिला पालकर देखील उपस्थित होती. या केळवणाला आयराने नुपूरसाठी खास मराठीत उखाणा घेऊन त्याला घास भरवला होता. “मला मराठी येत नाही, पण पोपयसाठी मी कधी नाही म्हणत नाही,” असा उखाणा तिने होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला होता.